Tuesday, June 23, 2009

शूर आम्ही सरदार...

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
देव, देस अन धर्मापायी प्राण घॆतलं हाती

आईच्या गर्भात उमगली झूंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं, जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलून घे़ईल अशी पहाडी छाती
देव, देस अन धर्मापायी प्राण घॆतलं हाती

झुंजाव वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं
लढून मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठावं
देशापायी इसरू माया, ममता नाती
देव, देस अन धर्मापायी प्राण घॆतलं हाती...


गीत : शांता शेळके
संगीत : आनंदघन (लता मंगेशकर )
स्वर : पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट : मराठा तितूका मेळवावा (१९६४)
राग : हंसध्वनी (नादवेध)

4 comments:

  1. अतिशय सुंदर ब्लॉग आहे. असाच संग्रह करत रहा.
    तुमच्या ब्लॉगला मनपूर्वक शुभेछा

    - स्वस्तिक

    अभिमान आहे मी घाटी असल्याचा

    ReplyDelete