Thursday, July 9, 2009

छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार

छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार ॥ध्रु॥

हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधुनिया गाजवी समरांगण
आई भवानी प्रसन्न होउन देई साक्षात्कार ॥१॥

धर्माचा अभिमानी राजा देशाचा संरक्षक राजा
चारित्र्याचा पालक राजा घडवी देशोद्धार ॥२॥

स्फूर्तीकेन्द्र हे भारतियांचे दैवत अमुच्या महाराष्ट्राचे
आद्यप्रवर्तक संघटनेचे सदा विजयी होणार ॥३॥

पूजा बांधू सामर्थ्याची इच्छापूर्ती श्रीशिवबाची
उठता ऊर्मी समर्पणाची काय उणे पडणार ॥४॥

प्रभात झाली लोकशाहिची जाणिव हो कर्तव्याची
घेउ प्रतिज्ञा एकजुटीची नको आता माघार ॥५॥

कितीक झाले आणी होतिल राजे असंख्य जगती
परी न शिवबासम होइल या अवनीवरती राजे छत्रपती ॥६॥

2 comments:

  1. शिवरायांच्या कर्तृत्वाचे वर्णनात्मक काव्य सुंदर आहे ते वाचून तरुणांच्या मनांत देशाभिमान जागृत होवो .

    ReplyDelete
  2. होय... खरंच...!!!!

    ReplyDelete